SSC GD Recruitment 2024
SSC GD Recruitment 2024: उमेदवारांसाठी निघाली आहे नोकरीची चांगली संधी . स्टाफ सिलेक्शन कमिशन (ssc) मध्ये कोन्स्तेबल व रायफलमॅन ( जनरल ड्यूटी ) ह्या पदांच्या रिक्त जागा भरण्याकरिता हि भरती सुरु झाली आहे . जे उमेदवार यासाठी पात्र आहेत किवा अर्ज करू इच्छित आहेत त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात आले आहेत . आणि ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत . तसेच या भरतीकरिता उमेदवारांचे वय हे १८ वर्षे ते २३ वर्षे असे असावे . ह्या भरती बद्दलची अधिसूचना हि अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आली आहे ती उमेदवारांनी बघावी . तसेच या आयोगाने विविध सशस्त्र दलातील ( CAPFs) च्या भारीकारिता एकूण ३९,४८१ एवढ्या रिक्त पदांची भरती करिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे . तसेच ह्या भरतीची ऑनलाईन पद्धतीचे अर्ज हे ०५ सप्टेंबर पासून सुरु झाले आहेत . आणि या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख हि १४ ऑक्टोबर २०२४ अशी दिली आहे त्यामुळे जे उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी ह्या तारखेच्या आधी आपला अर्ज भरायचा आहे .
SSC GD Recruitment 2024
एस एससी कडून ह्या भरतीची जाहिरात हि ०५ सप्टेंबर पासून प्रकाशित केली गेली आहे . ती एस एससी च्या अधिकृत वेबसाईट वर करण्यात आली असून जे उमेदवार अर्ज करू इच्छित आहेत ज्यांना ह्या भरतीकरिता अर्ज करयचा आहे , त्यांनी जाहिरातीमध्ये दिल्या नुसार ह्या भरतीसाठी आवश्यक असणारी वयोमर्यादा , शैक्षणिक पात्रता , अर्ज शुल्क , नोकरी करण्याचे ठिकाण , तसेच निवड प्रक्रिया , तसेच रिक्त असलेल्या जागा , हि सर्व माहिती व्यवस्थित चेक करू आपला अर्ज करावा तसेच अर्ज सोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडावी . या भरतीसाठी फक्त १० वी पास असण्याची आवश्यकता आहे . त्यामुळे जे १० वी पास उमेदवार आहे त्यांच्यासाठी हि नोकरीची चांगलीच संधी आहे असे म्हणता येईल . त्यामुळे कसलाही उशीर न करता ह्या संधीचे सोने करून घ्या शेवटच्या तारखेच्या आधी अर्ज करावा .
- पद संख्या – ३९,४८१ जागा
- पदाचे नाव –कोन्स्तेबल व रायफलमॅन ( जनरल ड्यूटी )
- वयोमर्यादा – १८ वर्षे ते २३ वर्षे वयोमर्यादा
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
- अधिकृत वेबसाईट – https://ssc.gov.in/
- अर्ज नोंदणी सुरु होण्याची तारीख – ०५ सप्टेंबर २०२४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ ऑक्टोबर २०२४
SSC GD Constable Vacancy Details 2024
Force | Male | Total | Female | Total | |||||||||
SC | ST | OBC | EWS | UR | SC | ST | OBC | WES | UR | ||||
BSF | 2018 | 1489 | 2906 | 1330 | 5563 | 13306 | 356 | 262 | 510 | 234 | 956 | 2348 | 15654 |
CISF | 959 | 687 | 1420 | 644 | 2720 | 6430 | 106 | 71 | 156 | 74 | 308 | 715 | 7145 |
CRPF | 1681 | 1213 | 2510 | 1130 | 4765 | 11290 | 34 | 20 | 53 | 19 | 116 | 2421 | 11541 |
SSB | 122 | 79 | 187 | 82 | 349 | 819 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 819 |
ITBP | 345 | 326 | 505 | 197 | 1191 | 2564 | 59 | 59 | 90 | 21 | 224 | 453 | 3017 |
AR | 124 | 223 | 205 | 109 | 487 | 1148 | 9 | 21 | 16 | 6 | 48 | 100 | 1248 |
SSF | 5 | 3 | 9 | 4 | 14 | 35 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 0 | 35 |
NCB | 0 | 1 | 5 | 0 | 5 | 11 | 0 | 0 | 4 | 1 | 6 | 11 | 22 |
Total | 5254 | 4021 | 7747 | 3496 | 15094 | 35612 | 564 | 433 | 829 | 355 | 1688 | 3869 | 39481 |
Education Qualification Of SSC GD Bharti 2024
वरील भरतीसाठी उमेदवारांस आवश्यक शैक्षणिक पात्रता हि खाली दिली आहे .
पदाचे नाव | शैक्षणिक अहर्ता |
कोन्स्तेबल व रायफलमॅन ( जनरल ड्यूटी ) | या पदाकरिता उमेदवार हा १० ची परीक्षा हि मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून किवा ,मंडळाकडून पास असणे आवश्यक आहे . तसेच तसेच (०१-०१ २०२५ ) या तारखेपर्यंत दिलेली शैक्षणिक पात्रता पूर्ण केली नसेल तर ते उमेदवार या भरतीस पात्र धरले जाणार नाहीत . |
Application Fee Of SSC GD Notification 2024
वरील भरतीकरिता अर्ज करताना यामध्ये जे सर्वसाधारण उमेदवार आहेत त्यांना १००/- अर्ज शुल्क भरावे लागणार आहे तर अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती , महिला उमेदवार , माजी सैनिक , (ESM ) या उमेदवारांना अर्ज शुल्क हे माह केले आहे .
सर्वसाधारण उमेदवार | रुपये १००/- |
अनुसूचित जाती | अर्ज शुल्क नाही |
अनुसूचित जमाती | अर्ज शुल्क नाही |
महिला उमेदवार | अर्ज शुल्क नाही |
माजी सैनिक | अर्ज शुल्क नाही |
Important Dates Of SSC GD Bharti 2024
वर देण्यात आलेल्या भरतीसाठी आवश्यक असलेल्या महत्वाच्या तारखा आणि वेळापत्रक हे खाली देण्यात आले आहे . ते पहा .
इवेंट | तारखा |
स्टाफ सिलेक्शन कमिशन (ssc) भरती अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याच्या तारीख | ०५ सप्टेंबर २०२४ ते १४. ऑक्टोबर २०२४ स्टाफ सिलेक्शन कमिशन (ssc) |
स्टाफ सिलेक्शन कमिशन (ssc )भरती अंतर्गत अर्ज प्राप्त करण्याची शेवटची तारीख आणि वेळ | १४ ऑक्टोबर २०२४ वेळ (२३०० 🙂 |
स्टाफ सिलेक्शन कमिशन (ssc) भरती ऑन लाईन अर्जाची फी भरण्याची शेवटची तारीख व वेळ . | १५ ऑक्टोबर २०२४ (२३:००) |
ऑनलाईन अर्जाच्या पेमेंट बद्दलच्या दुरुस्ती करण्याच्या तारीख आहे तसेच तसेच अर्जचा फॉर्म दुरुस्त करण्याच्या तारखा | ०५ नोव्हेंबर २०२४ ते ०७ नोव्हेंबर २०२४ वेळ (२३:००) |
संगणकावर आधारित परीक्षा चे तात्पुरते असलेले वेळापत्रक | जानेवारी – फेब्रुवारी २०२५ |
SSC GD Selection Mode 2024-2025
स्टाफ सिलेक्शन कमिशन (ssc) २०२४ च्या भरतीकरिता उमेदवारांची निवड प्रक्रिया हि खालीलप्रमाणे करण्यात येणार आहे .
- यामध्ये सर्वात प्रथम संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाईल . यामध्ये जनरल नॉलेज , गणित ,सामन्य ज्ञान , हिंदी आणि इंग्रजी या विषयावर प्रश्न असतील .
- शाररीक कार्यक्षमता चाचणी – या यामध्ये उमेदवाराचे पळणे , लांब उडी , उंच उडी , अश्या शाररीक क्रियांची चाचणी केली जाईल .
- शाररीक मापदंड चाचणी – यामध्ये उमेद्वारच्या शरीराची चाचणी केली जाईल . यात छाती . उंची उमेद्वारचे वय , तसेच वजन
- कागदपत्रे तपासणी – आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल .
- वैदकीय तपासणी – यामध्ये उमेदवारांच्या (DME/RME) अश्या प्रकारच्या काही चाचण्या केल्या जातील .
- वरील सर्व दिलेल्या चाचण्या आणि पूर्ण करणाऱ्या आणि पात्र ठरणाऱ्या उमेद्वारंची यामध्ये निवड केली जाईल
Examination Pattern For Constable 2024-2025
परीक्षेसाठी वेळ हा ०१ तासाचा दिला आहे परीक्षा पद्धत CBT असणार आहे . तसेच प्रत्येक उत्तरासाठी २ गुण देण्यात येतील आणि चूक असलेल्या उत्तरास प्रत्येकी ०५०. गुण दिले जातील अधिक माहितीकरिता भरतीची मूळ जाहिरात वाचावी .
विषय | प्रश्न | गुण |
बुद्धीमत्ता/ तर्क | २० | ४० |
सामन्य ज्ञान | २० | ४० |
गणित | २० | ४० |
इंग्रजी | २० | ४० |
एकूण | ८० | १६० |
SSC GD Physical Measurement Test (PMT) 2024
श्रेणी | उंची | छाती |
SC/OBC साठी | पुरुष : १७० सेमी महिला :१५७ सेमी . | ८० सेमी +विस्तार |
ST साठी | पुरुष : १६२ सेमी . महिला : १५० सेमी | ७० सेमी+ विस्तार |
SSC GD PET चाचणी 2025
पुरुष : यामध्ये परुष उमेदवारांना २४ मिनिटाच्या आत ५ किलोमीटर इतके अंतर धावायचे आहे . तर ग्रामीण भागामधील किवा दुर्गम भागामधील उमेदवारास ७ मिनिटामध्ये १.६ किलोमीटर इतके अंतर धावायचे आहे .
महिला : यात महिला उमेदवारास ८.५ मिनिटामध्ये १.६ किलोमीटर इतके अंतर धावायचे आहे . त्याचप्रमाणे ग्रामीण भागामधील किवा दुर्गम भागामधील उमेदवारास ७ मिनिटामध्ये १.६ किलोमीटर इतके अंतर धावायचे आहे .
Age Limit Of SSC GD Recruitment 2024
स्टाफ सिलेक्शन कमिशन (ssc) २०२४ च्या भरतीकरिता उमेद्वारंचे वय हे १८ वर्षे ते २३ वर्षे असे दिले आहे . तसेच काही श्रेणीतील उमेदवारांना वयामध्ये सूट दिली आहे ती खालीलप्रमाणे पहा .
श्रेणी | सूट |
अनुसूचित जाती आणी अनुसूचित जमाती | ०५ वर्षे |
ओबीसी | ०३ वर्षे |
माजी सैनिक | ०३ वर्षे |
गुजरात येथील १९८४ मधील दंगलीत किवा २००२ मधल्या जातीय दंगलीत मारली गेली असलेली मुले आणि पिडीत ,आश्रित (अनारक्षित ) | ०५ वर्षे |
गुजरात येथील १९८४ मधील दंगलीत किवा २००२ मधल्या जातीय दंगलीत मारली गेली असलेली मुले आणि पिडीत ,आश्रित (अनारक्षित ) (ओबीसी) | ०८ वर्षे |
गुजरात येथील १९८४ मधील दंगलीत किवा २००२ मधल्या जातीय दंगलीत मारली गेली असलेली मुले आणि पिडीत ,आश्रित (अनारक्षित ) SC/ST | १० वर्षे |
How To Apply For SSC GD Recruitment 2024
स्टाफ सिलेक्शन कमिशन (ssc) २०२४ भरतीसाठी अर्ज कसा करायचा ते पुढीलप्रमाणे पहा .
- स्टाफ सिलेक्शन कमिशन (ssc) मध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करायचा आहे .
- तसेच अर्ज करताना भरतीचे नोटीफिकेशन एकदा नीट काळजीपूर्वक वाचून घ्या .
- अर्ज करताना अर्जासोबत अधिसुच्नेमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत .
- तसेच अर्ज सबमिट करण्याआधी अर्जामध्ये काही बदल करायचा असल्यास करून घ्या .
- अर्जामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरावी अपूर्ण अर्ज नाकारले जातील .
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२४ दिली आहे या तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .
- या भरतीच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF जाहिरात वाचा .
Important Links Of SSC GD Application 2025
स्टाफ सिलेक्शन कमिशन (ssc) २०२४ च्या भरतीसाठी महत्वाच्या लिंक्स खाली पहा .
- PDF जाहिरात – https://shorturl.at/d11je
- ऑनलाईन अर्ज करा . – https://shorturl.at/rqiCb
- वेबसाईट लिंक – https://ssc.gov.in/