NHM NaviMumbai Recruitment 2024
NHM NaviMumbai Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नवी मुंबई महानगरपालिका मध्ये भरतीची नवीन जाहिरात निघाली असून यामध्ये वैदकीय अधिकारी ,वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक , टी.बी आरोग्य अभ्यागत ” या पदांच्या जागा : राष्ट्रीय आरोग्य अभियान नवी मुंबई महानगरपालिका मध्ये जागा भरण्यात येणार असून त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत . या भरतीचे अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत . त्यानुळे जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी भरतीच्या शेवटच्या तारखेच्या आधी आपले अर्ज दिलेल्या संबधित पत्यावर पाठवायचे आहेत . या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख हि १४ ऑक्टोबर २०२४ अशी दिली आहे . तसेच वैदकीय अधिकारी पदाकरिता मुलाखत ठेवली आहे . उमेदवारांनी वेळेत मुलाखतीसाठी हजर राहावे . मुलाखतीची तारीख ०७ ऑक्टोबर २०२४ देण्यात आली आहे . नवी मुंबई महानगरपालिकेने हि उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी निर्माण करून दिली आहे . त्यामुळे पदानुसार पात्रठरणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांनी लगेच आपले अर्ज भरून घ्यावे . तसेच या भरतीची अधिक माहिती मिळविण्याकरिता कृपया खाली दिलेली PDF जाहिरात बघावी .
NHM NaviMumbai Recruitment 202
राष्ट्रीय आरोग्य अभियान नवी मुंबई महानगरपालिका ने या भरतीची जाहिरात नुकतीच महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून या या भरतीचे अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२४ दिली आहे . त्यामुळे ज्या उमेदवारांना या महानगरपालिकेचा अर्ज करायचा आहे त्यांनी दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधी आपला अर्ज करून घ्या कारण उशिरा गेलेले अर्ज नाकारले जाण्याची शक्यता असते . तसेच या भरतीची संपूर्ण माहिती हि खालीलप्रमाणे दिली आहे . अर्ज करण्यासाठी आवश्यक वयोमर्यादा ,शैक्षणिक पात्रता , अर्ज करण्याची पडे . अर्ज करण्याची पद्धत , अर्ज शुल्क , नोकरीचे ठिकाण , तसेच पद्फ जाहिरात हि सर्व माहिती खाली . पहा . आणि त्वरित आपला अर्ज भरून घ्या . तसेच अर्ज हा नीट भरावा अर्जामध्ये कुठलीही खोटी माहिती ,अपूर्ण माहिती लिहू नये किवा कोणतीही माहिती लपऊ नये तसे जर नवी मुंबई महानगरपालिका समितीच्या लक्षात आले तर त्या उमेदवाराचा अर्ज रद्द होऊ शकतो . ह्या सर्व बाबीची व्यवस्थित काळजी घेऊन आपला अर्ज करावा .
- पदांची नावे – वैदकीय अधिकारी ,वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक , टी.बी आरोग्य अभ्यागत
- पदांच्या रिक्त जागा – ०६ जागा
- नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता हि दिलेल्या पदानुसार आहे त्यासाठी PDF जाहिरात वाचा
- वयोमर्यादा –
- खुला वर्गासाठी – ३८ वर्षे
- राखीव वर्गासाठी – ४३ वर्षे
- अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन पद्धत
- अर्ज फी –
- निवड प्रक्रिया – मुलाखत वैदकीय अधिकारी
- अर्ज पाठविण्याचा पता – आरोग्य विभाग ३ रा मजला , नमूमपा मुख्यालय , प्लॉट नं-१ से १५ ए , किल्ले गावठाण जवळ सी .बी .डी. बेलापूर नवी मुंबई ४००६१४ या ठिकाणी
- अर्ज करायची शेवटची तारीख -१४ ऑक्टोबर २०२४
- मुलाखतीचा पत्ता – वर देण्यात आलेल्या पत्यावर
- मुलाखतीची तारीख – ०१ ऑक्टोबर २०२४
- वेबसाईट लिंक – https://www.nmmc.gov.in/
Vacancy Of NHM NaviMumbai Bharti 2024
पदांची नावे | पदांच्या रिक्त जागा |
वैदकीय अधिकारी | ०२ जागा |
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक | ०२ जागा |
, टी.बी आरोग्य अभ्यागत | ०२ जागा |
Education Qualification Of NHM NaviMumbai Recruitment 2024
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
वैदकीय अधिकारी | या पदाकरिता उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया कडून एमबीबीएस किवा त्याचा समान पदवी मिळवली असावी आणि रोटरी इंटर्ण्शीप पूर्ण करणे आवश्यक आहे |
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक | वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक मान्यताप्राप्त संस्थेकडून बॅचलर डिग्री मिळवली असावी किवा सॅनिटीरी इन्स्पेक्टर कोर्स संगणक केला असावा किवा ऑपरेशन मध्ये प्रमाणपत्र मिळवले असावे तसेच उमेदवाराकडे दुचाकीचा परवाना हवा आणि दुचाकी चालवता यायला हवी . |
, टी.बी आरोग्य अभ्यागत | विज्ञानांत पदवीधर असायला हवे तसेच विज्ञानांमधील इंटर मीजीएट (१०+२) व MPW/LHV/ANM / आरोग्य कर्मचारी /प्रमाणपत्र किवा आरोग्य शिक्षण /समुउपदेशन मधले उच्च अभ्यासक्रम म्हणून काम करण्याचा अनुभव असावा .आणि क्षय रोग आरोग्य आणि अभ्यगतांचा मान्यताप्राप्त अभ्यासक्रम व संगणक ऑपरेशन चे प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्राप्त केले असावे . (कमीत कमी २ महिने ) |
शैक्षणिक पात्रता : या भरतीमध्ये उमेद्वारची शैक्षणिक पात्रता हि अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला अधिसुच्नेमध्ये सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे .
तसेच उमेदवारांनी अर्ज भरताना अर्जामध्ये शेवटच्या अंतिम वर्षात मिळालेलं गुण आणि टक्केवारी व्यवस्थित लिहायची आहे . गुण आणि गुणाची टक्केवारी हि अर्जामध्ये दिलेल्या टक्केवारीशी न जुळल्यास असे अर्ज नाकारले जातील .
तसेच शेवटच्या परोक्षेतील गुण हे ग्रेड किवा श्रेणी मध्ये दिले असल्यास त्याचे संबधित असलेल्या संस्थेकडून गुणामध्ये बदल करून घ्यावे . आणि ते मुलाखतीच्या वेळी घेऊन यावे .
Salary Details Of NHM Navi Mumbai
वरील भरतीच्या अर्ज करणाऱ्या उमेदवारांना या महानगरपालिका अंतर्गत किती वेतन दिले जाईल ते पाहू .
पदांची नावे | वेतनश्रेणी /पगार |
वैदकीय अधिकारी | रुपये .६०,०००/- |
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक | रुपये .२०,०००/- |
, टी.बी आरोग्य अभ्यागत | रुपये .१५,५००/- |
Age Limit Of NHM NaviMumbai Notification 2024
वरील भरतीसाठी उमेदवारांचे वय हे अर्ज करण्याकरिता किती असायला हवे ते पुढीलप्रमाणे पाहू
खुला वर्ग | ३८ वर्ष |
राखीव वर्ग | ४३ वर्ष |
निवृत्त शासकीय अधिकारी विशेतज्ञ | ७० वर्ष |
कर्मचारी | ६० वर्ष |
Selection Process Of Age Limit Of NHM Navi Mumbai Notification 2024
वर दिलेल्या भरती अंतर्गत उमेदवारांची निवडप्रक्रिया हि खाली दिल्या प्रमाणे होईल .
वैदकीय अधिकारी – या पदाची निवड प्रक्रिया हि मुलाखतीने केली जाईल .
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक , टी.बी आरोग्य अभ्यागत या पदांची निवड प्रक्रिया हि उमेदवारांचे गुण यावर आधारितअसेल .
Application Fee Of NHM NaviMumbai Notification 2024
वरील नवी मुंबई महानगरपालिका भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज शुल्क भरायचे आहे अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी काळजी घ्यावी .
यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी अर्ज शुल्क हे १५०/- रुपये आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हे १०० /- रुपये आहे .अर्ज अर्ज शुल्क भरण्याकरिता डिमांड ड्राफ्ट चा वापर करावा याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही . अर्ज अपात्र ठरेल .
Important Documents For NHM NaviMumbai Bharti 2024
वरील नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी उमेदवारांना अर्जासोबत काही आवश्यक असणारी कागदपत्रे जोडायची आहेत ती खालील प्रमाणे पाहू .
- शैक्षणिक पात्रता असलेली प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
- वयाचा पुरावा
- कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
- शासकिय व निम शाशकीय संस्थामध्ये काम केले असल्याचे अनुभव प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साईजचा सद्य स्थितीतला फोटो
- अर्जदार विवाहित असल्यास विवाहित प्रमाणपत्र आणि नावात बदल झाल्यास राजपत्र
- फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र )
- INTEGRATED HEALTH AND FAMILY WELFARE SOCIETY UMBRELLA SOCIETY यांच्या नावे Demand Draf
How To Apply For NHMNavi Mumbai Application 2024
- वरील भरतीसाठी अर्ज हे उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत .
- उमेदवारांनी अर्ज करताना आधी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी .
- अर्जासोबत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी .
- अर्ज करताना अर्जामध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरावी . चुकीची किवा खोटी माहिती भरू नये .
- अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२४ आहे .
- अर्ज पाठविण्याचा पता – आरोग्य विभाग ३ रा मजला , नमूमपा मुख्यालय , प्लॉट नं-१ से १५ ए , किल्ले गावठाण जवळ सी .बी .डी. बेलापूर नवी मुंबई ४००६१४ या ठिकाणी
- अधिक माहिती साठी PDF जाहिरात बघा .
अर्ज भरताना आवश्यक सूचना पुढीलप्रमाणे पहा .
- उमेदवाराने अर्ज करताना स्वताचे संपूर्ण नाव लिहावे माध्यमिक शाळे मधील प्रमाणपत्र नुसार तसेच माध्यमिक शाळेतील परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी .
- तसेच माध्यमिक शाळेमधील प्रमाणपत्र मध्ये लिहलेली जन्मतारीख हीच अर्जामध्ये लिहावी .
- उमेदवाराचे लिंग कोणते ते सुद्धा यामध्ये लिहावे .
अर्जकरणारी व्यक्ती विवाहित असेल तर तसे विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि नावामध्ये बदल झाला असेल तर राजपत्र जोडावे . - तसेच उमेदवारांनी चालू असलेला मोबाईल नंबर आणि ई- मेल आयडी यामध्ये देणे गरजेचे आहे .
- उमेदवाराने त्यच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचा पुरावा म्हणून हमीपत्र जोडणे आवश्यक आहे .
- उमेदवार हा महराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे असे अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे .
- तसेच इतर मागास जाती . भटक्या जाती , विशेष मागास वर्ग , आर्थिक रित्या दुर्बल घटक, सा ,शै .मा .प्र. मोडणाऱ्या उमेदवारांनी नॉनक्रिमी लेयर प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे .
- त्याचप्रमाणे उमेदवारांनी आपला स्वताचा आताचा पता आणि कायम स्वरुपिचा पत्ता अर्जामध्ये लिहणे आवश्यक आहे .
Important Links For NHM NaviMumbai Bharti 2024
- PDF जाहिरात – https://shorturl.at/fuwz7
- वेबसाईट लिंक – https://www.nmmc.gov.in/