---Advertisement---

कोल्हापूर पोलीस भरती मध्ये सुरु झाली २२ रिक्त पदांची नवीन भरतीची जाहिरात ! उमेदवारांनी पहा कसा करावा अर्ज !

By dhanashribagad6

Updated On:

Kolhapur Police Bhatri 2024
---Advertisement---

Kolhapur Police Bhatri 2024 : कोल्हापूर पोलीस विभाग अंतर्गत पोलीस पदांच्या एकूण २२ रिक्त जागा भरल्या जाणार असून त्यासाठी कोल्हापूर पोलीस विभागगाकडून अर्ज मागवले आहेत . यासाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत . आणि या भरती मध्ये विधी अधिकारी या पदांच्या भरती केल्या जाणार आहेत . जे उमेदवार पोलीस भरती मध्ये रुजू होण्यास इचुख आहेत . त्या उमेदवारांकरिता हि पोलीस विभागत जाण्याची उत्तम संधी आहे . त्यामुळे अधिसुच्नेमध्ये सांगितल्या प्रमाणे जे उमेदवार दिलेल्या पदास शैक्षणिक आणि शाररीक रित्या पात्र ठरत आहेत त्यांनी त्वरित आपले अर्ज दिलेल्या पत्यावर पाठून द्यावे . या भरतीची नोकरी करण्याचे ठिकाण हे कोल्हापूर आहे . तसेच या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ अशी दिली आहे . त्यामुळे उमेदवारांनी कसलाही विलंब न करता आपले अर्ज लवकरात लवकर शेवटच्या तारखेच्या आधी संबधित पत्यावर पाठवायचे आहेत . तसेच तुम्हाला या भरतीची अधिक माहिती मिळविण्यासाठी तुम्ही खाली दिलेली PDF जाहिरात वाचू शकता त्यामध्ये सर्व माहिती सविस्तरपणे देण्यात आली आहे .

कोल्हापूर पोलीस विभाग अंतर्गत निघालेल्या या नवीन भरतीमध्ये एकूण २२ पदे भरली जाणार आहेत . आणि त्यासाठी उमेदवारांनी ऑफलाईन स्वरूपात अर्ज करायचे आहेत . तसेच अर्ज हे ३१ ऑक्टोबर २०२४ या तारखे पर्यंत दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत . त्यामुळे या भरतीची नोकरीचे ठिकाण हे कोल्हापूर आहे . आणि शैक्षणिक पात्रता ,अर्ज शुल्क ,उमेदवाराचे वय , वेतन , निवड पर्क्रिया , वेबसाईट लिंक , या सर्व माहितीचा तपशील खाली दिला आहे तो पाहावा . तसेच हि भरती कंत्राटी पद्धतीची असल्याने या भरतीचे काही नियम आणि अटी कोल्हापूर पोलीस विभागाने घालून दिले आहे . ते खाली पाहू शकता .

आणखी वाचा

  • पदांची नावे – विधी अधिकारी
  • पदांच्या रिक्त जागा – २२ रिक्त जागा
  • नोकरी करण्याचे ठिकाण – कोल्हापूर
  • वयाची मर्यादा – ६० वर्षे त्यापेक्षा जास्त नसावे .
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन पद्धत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ ओक्टोबर २०२४
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस अधीक्षक कार्यालय ,रमण मला ,कसबा बावडा ,कोल्हापूर -४१६००३
  • अधिकृत वेबसाईट – https://kolhapurpolice.gove.in/
पदांची नावे रिक्त जागा
विधी अधिकारी २२ रिक्त जागा

खालील पदे हि विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परीक्षेत्रासाठी खाली दिलेल्या जिल्ह्यासाठी त्यांच्या समोर दिल्या रिक्त पदांची विधी अधिकारी आणि विधी अधिकारी गत (ब ) हि पदे मंजूर झाली आहेत .

अ .क्र. जिल्हा विधी अधिकारी -ब विधी अधिकारी एकूण भरायची पदे
०१. कोल्हापूर ०१ ०१ ०१
०२. सांगली ०३ ०३ ०३
०३. सातारा ०६ ०६ ०६
०४. सोलापूर ग्रामीण ०३ ०३ ०३
०५. पुणे ०८ ०९ ०९
एकूण २१ २२ २२

कोल्हापूर पोलीस भरती २०२४ च्या भरतीचा अर्ज करताना उमेदवारांचे शिक्षण काय असावे ते पहा .

पदांची नावेशैक्षणिक अहर्ता
विधी अधिकारी
या भरतीमध्ये विधी अधिकारी या पदाकरिता उमेद्वारचे शिक्षण हे उमेदवाराणे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कायदेशीर पदवी मिळवली असावी . आणि तो सनद धारक असला पाहिजे . तसेच विधी अधिकारी गट-व व विधी अधिकारी या या पदाकरिता वकिली व्यवसाय केल्याचा ५ वर्षाचा अनुभव असावा . तसेच उमेदवार गुन्हेगारी विषयक ,सेवाविषयक ,प्रशाशनिक या सगळ्या प्रकारच्या कायद्याची स्थिती किवा चोकशी विभागाची यामध्ये ज्ञानी असावा . त्यामुळे कायदेशीर असलेली कार्यवाही तो व्यव्स्थ्तीत रित्या पार पाडू शकेल . त्याचप्रमाणे उमेदवाराला मराठी ,इंग्रजी आणि हिंदी विषयाचे आवश्यक ज्ञान असायला हवे .

या वर दिलेल्या भरतीसाठी उमेदवारांना किती वेतन दिले जाईल ते खालीलप्रमाणे पहा .

पदांची नावे वेतनश्रेणी /पगार
विधी अधिकारी रुपये . २५०००/- अधिक दूरध्वनी आणि प्रवास खर्च आणि रुपये . ३०००/- हे एकूण रुपये २८०००/- व रुपये २००००/- दूरध्वनी व प्रवास खर्च मिळून रुपये . ३०००/- हे सगळे मिळून एकूण रुपये हे २३०००/-

वरील पोलीस भरतीचा अर्ज करताना उमेदवारांचे वय काय असावे याबद्दल माहिती खाली पहा .

या भरतीमध्ये विधी अधिकारी आणि विधी अधिकारी गट( ब ) या पदाकरिता उमेदवार चे वय हे दिलेल्या अधिसुच्नेमध्ये ६० वर्षे इतके असावे . त्यापेक्षा जास्त नसावे .

वर दिलेल्या कोल्हापूर पोलीस भरती २०२४ प्रकारीयेमध्ये विधी अधिकारी या पदांची भरती करण्यात येणार असून त्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड कशी केली जाईल ते पाहू .

यामध्ये सर्वात प्रथम उमेद्वारची लेखी परीक्षा घेण्यात येईल . ५० गुणाची आणि वेळ असेल १ तासाचा .

यामध्ये वस्तुनिष्ठ बहु पर्यायी प्रश्न विचारण्यात येतील . गुण -५०

वस्तुनिष्ठ बहु पर्यायी प्रश्न : यामध्ये सेवा विषयक आणि फौजदारी प्रकरणातील आणि लालाचपुत प्रतिबंधक विभागाच्या प्रकरणातील भारताची नागरी सुरक्षा सहिता :२०२३ कलम २१८ किवा महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ मधल्या प्रकरण मध्ये अभियोग दाखल करण्याची परवानगी देण्याकरिता सक्षम अधिकार्याला व्यास्थित निर्णय घेता येतील या प्रकारच्या छाननी करण्याची क्षमता तपासणारे प्रश्न आणि सध्याच्या स्थितील न्यायाची स्थिती काय आहे . आणि भारतीय न्यायासाहिता २०२३ बाबातीत्च्या ज्ञानाचे आकलन करणार्या प्रश्नांचा यामध्ये समावेश असेल .. तसेच भारतीय दंड दंड सहिता १८६० व फोजदारी प्रक्रिया सहित १९७५ आणि भारतीय नागरी सुरक्षा कायदा सहिता २०२३ तसेच फोजदारी न्याय निवाडे ,किरकोळ पद्धतीचे कायदे आणि पोलीस विभागाशी असणारे सर्व कायदे , महारष्ट्र नागरी सेवा नियम व विभागीय चौकशी संबधितचे न्याय निवाडे या प्रश्नांचा या मध्ये समावेश असेल .

मुलाखत : मुलाखती करिता जे उमेदवार लेखी परीक्षा उतीर्ण झाले आहेत . किवा पात्र झाले आहेत . त्या उमेदवारांच्या एकूण पदांच्या ( विधी अधिकारी आणि विधी अधिकारी गट ब ) २१ पदे यामधील ३ पट उमेदवार लेखी परीक्षेमधील मेरीट अनुसार मुलाखीत करोता पत्र ठरले जातील . तसेच लेखी परीक्षा आणि मुलाखत कधी असेल याची तारीख उमेदवारांना नंतर कळविली जाईल . तसेच लेखी परीक्षेमध्ये मिळालेले आणि तोंडी परीक्षेमध्ये मिळालेले एकूण गुण हे दोन्ही मिळवून गुनाकारामानुसार जे उमेदवार पात्र ठरतील तयंची कंत्राटी पद्धतीने निवड केली जाईल . तसेच या नियुक्तीसाठी उमेदवाराला कमीत कमी ६० गुण प्राप्त झाले असावे .

आटीआणि शर्ती /नियम

वरील कोल्हापूर पोलीस भरती करिता उमेदवारांनी अर्ज करताना काही अटी आणि शर्ती दिल्या आहेत त्या खालीलप्रमाणे पहा .

१. वरील भरतीची पदे हि कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे . त्त्यामुळे या पदावर नियुक्त केलेल्या उमेदवारास शासकीय अधिकारी म्हणून किंवा शासकीय कर्मचारी म्हणून मानले जाणार नाही .

२. हि भरतीची पर्क्रिया हि ११ महिन्याकरिता केली जाणार असून आवशकता भासल्यास करारनाम्याची मुदत हे वेळोवेळी वाढवली जाईल . किवा एकाच वेळी हि मुदत ११ महिन्यापेक्षा जास्त असणार नाही याची दखल हे नियुक्ती प्राधिकारी घेतील . तसेच अश्या प्रकारे फक्त ३ वेळा उमेद्वारची नेमणूक करता येईल .

३. तसेच निवड झालेल्या उमेदवाराचे ११ महिन्याच्या काळात त्याचे वकिलीव्यावसायी संबधित कुठलेही खाजगी काम /हे व्यवसाय नियुक्ती पार्धीकार्यच्या परवानगी घेतल्या शिवाय करता येणार नाही . तसेच नियुक्ती प्रधीकार्याने त्या बाबतची परवानगी दिली नसेल आणि परवानगी न देता उमेदवाराने खाजगी व्यवसाय चालू ठेवला आणि त्यामुळे शाश्नाच्या कामांमध्ये अडचण निर्माण होत असेल तर अश्या उमेदवाराची नेमणूक केली जाणार नाही . रद्द केली जाईल .

४. लेखी परीक्षा पास झालेले आणि पात्र ठरलेलेया उमेदवारान मधून मुलाखती घेऊन शेवटची निवड केली जाईल . त्यासाठी उमेदवारांना मुलाखत कधी असेल याची तारीख कळवली जाईल . लेखी परीक्षा तारीख , वेळ , ठिकाण , शेवटची निवड याबद्दलची माहिती उमेदवारांना कार्यालयाकडून कळवली जाईल .

.५. तसेच उमेदवारांनी लेखी परीक्षा आणि मुलाखतीला स्व खर्चाने जायचे आहे त्यासाठी कोणताही खर्च कार्यालयाकडून दिला जाणार नाही .

६. तसेच या करार पद्धतीने होणार्या भरतीमध्ये नियुक्ती केलेल्या अधिकारी किवा कर्मचारी याला एकत्रित वेतन व अदनेयू दूरध्वनी व प्रवास खर्च याशिवाय इतर कुठलेही भत्ते दिले जाणार नाहीत .

 

वरील कोल्हापूर पोलीस भरती २०२४ चा अर्ज कसा करावा ते पहा .

  • वरील भरतीची प्रक्रिया हि ऑफलाईन पद्धतीने होणार आहे .
  • वरील भरतीचा अर्ज करताना उमेद्वारणी भरतीचे नोटिफिकेशन एकदा नीट वाचून घ्यावे .
  • अर्ज हा दिलेल्या पत्यावर दिलेल्या वेळेत पाठवावा . अर्ज हा दिलेल्या तारखे नंतर आल्यास त्याचा विचार केला जाणार नाही .
  • अर्ज करताना कुठलीही चूक करू नये .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ आहे .
  • अर्ज करताना त्यामध्ये चालू असलेला मोबाईल नंबर आणि ई – मेल आयडी द्यावी .
  • अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडणे .
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस अधीक्षक कार्यालय ,रमण मला ,कसबा बावडा ,कोल्हापूर -४१६००३
  • अधिक माहितीसाठी PDF जाहिरात वाचा .

वर देण्यात आलेल्या कोल्हापूर पोलीस भरती २०२४ च्या भरतीचा अर्ज करताना आवश्यक असलेलेया लिंक खाली पहा .

---Advertisement---

Related Post