---Advertisement---

कोल्हापूर महानगरपालिका मध्ये उमेदवारांना नोकरीसाठी निघाली भरती! एकूण ४० पदे भरली जाणार ! ऑफलाईन करा अर्ज !

By dhanashribagad6

Updated On:

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024
---Advertisement---

वर देण्यात आलेल्या महानगरपालिका भरती करिता उमेदवारांना ११ ऑक्टोबर च्या आत अर्ज करायचे आहेत . जे उमेदवार महानगरपालिका भरती करिता उत्सुक आहेत किवा ज्यांची महानगरपालिका अंतर्गत काम करण्याची इच्छा आहे . त्यांनी खाली दिलेली शैक्षणिक पात्रता , नोकरी ठिकाण , वयोमर्यादा , अर्जाची फी , PDF जाहिरात , पदांची नावे , ह्या संधर्भातील सर्व माहिती वाचावी आणि त्यानुसार पात्र असणार्यांनि आपले अर्ज करावेत . महानगरपालिका अंतर्गत काम करण्याची हि उत्तम संधी आहे हि संधी सोडू नका .

Most Read

  • पदांच्या जागा : ४० जागा
  • पदांची नावे : पब्लिक हेल्थ मॅनेजर, एपीडेमियो लॉजीस्ट ,शहरी गुणवत्ता अशाव्षण समन्वयक , प्रयोगशाळा तंत्रज्ञ ,स्टाफ नर्स ,बहुउउदेषीय आरोग्य कर्मचारी
  • शैक्षणिक अहर्ता : शैक्षणिक अहर्ता हि दिलेल्या पदांच्या पात्रतेनुसार आहे .
  • नोकरी करण्याचे ठिकाण : कोल्हापूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ ऑक्टोबर २०२४
  • वयाची अट: ४३ वर्षे
  • अर्ज पाठविण्याचा पता : प्रतीसह मा. आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नावे ब्युरो कार्यालय ,मुख्य इमारत भाऊ सिंगजी रोड ,सी वौंर्द कोल्हापूर
  • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
  • अधिकृत वेबसाईट : https://web.kolhapurcorporation.gov.in/
पदाचे नाव पदांच्या रिक्त जागा
पब्लिक हेल्थ मॅनेजर०२ जागा
एपीडेमियो लॉजीस्ट०१ जागा
,शहरी गुणवत्ता अशाव्षण समन्वयक०१ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०३ जागा
स्टाफ नर्स १६ जागा
बहुउउदेषीय आरोग्य कर्मचारी१६ जागा

या भरतीमध्ये उमेदवारांना किती वेतनश्रेणी देण्यात येईल ते खालीलप्रमाणे पहा .

पदाचे नाववेतनश्रेणी /पगार
पब्लिक हेल्थ मॅनेजररुपये . ३२,०००/-
एपीडेमियो लॉजीस्टरुपये . ३५,०००/-
,शहरी गुणवत्ता अशाव्षण समन्वयकरुपये .३५,०००/-
प्रयोगशाळा तंत्रज्ञरुपये . १७,०००/-
स्टाफ नर्सरुपये . २०,०००/-
बहुउउदेषीय आरोग्य कर्मचारीरुपये . १८,०००/-

वर दिलेल्या महानगरपालिका भरतीकरिता उमेदवारांची शैक्षणिक पात्रता किती असली पाहिजे ते पुढीलप्रमाणे .

  • पब्लिक हेल्थ मॅनेजर : उमेदवार हा एमबीबीएस पदवी किवा हेल्थ सायन्समध्ये पदवीधर असावा .
  • एपीडेमियो लॉजीस्ट : MPH/MHA/MBA मध्ये वैदकीय पदवी मिळवली असावी .
  • शहरी गुणवत्ता अशाव्षण समन्वयक : MBBS/BAMS/BUMS/BHMS/BDS + MPH/MHA/MBA
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ : यामध्ये उमेदवार हा १२ वी पास असावा . +DMLT
  • स्टाफ नर्स : GNM/B. Sc नर्सिंग कोर्स केला असावा आणि यामध्ये महाराष्ट्र कौन्सिल नोंदणी नूतनीकरण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .
  • बहुउउदेषीय आरोग्य कर्मचारी : बहुउउदेषीय आरोग्य कर्मचारी या पदाकरिता विज्ञानातील उच्च माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र किवा परीक्षा पास असणे आवश्यक आहेकिवा शासनाने समतुल्य घोषित केली असलेली कोणतीही परीक्षा पास असणे गरजेचे आहे . तसेच अर्थ -वैदकीय मुलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम असणे अनिवार्य आहे . तसेच विभागातील आरोग्य कुटुंब व कल्याण प्रशिक्षण केंद्र किवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याद्वारे आरोग्य कर्मचारी या पदासाठी निश्चित केलेला अभ्यासक्रम तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वचता निरीक्षक (सॅनेटरी इन्स्पेक्टर ) किवा शासनाकडून मान्यता दिलेले स्वच्छता निरीक्षक याचा उमेदवाराने अभ्यासक्रम पूर्ण करून यामध्ये पास असणे आवश्यक आहे .

या भरतीकरिता उमेदवारांची निवड कशी केली जाईल ते पहा .

  • वर दिलेल्या भरतीसाठी उमेदवारांची निवड करताना काही गोष्टी लक्षात घेऊन मग केली जाणार आहे . यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता . कामाचा अनुभव तसेच अर्जांची छाननी आणि पदवी /पदविका जी एन एम कोर्स , डीएमएलटी ह्या पदांच्या आवश्यक परीक्षा मधील शेवटचे परीक्षांचे गुण तसेच संबधित असलेल्या पदांचे अनुभव आणि मिळालेल्या गुणाची टक्केवारीची आकडेवारी यांची योग्य गुणांकन यादी तयार केली जाईल आणि त्यामधून पत्र उमेदवारांची या भरतीसाठी निवड केली जाईल
  • तसेच प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी डीएमएलटी . यापेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य दिले जाईल आणि त्यांच्या अधिक असलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या गुणांच्या टक्केवारीनुसार शाश्नाच्या सूचनेनुसार अधिक गुण मिळालेल्या उमेद्वारंची निवड केली जाईल .त्याचप्रमणे स्टाफ नर्स या पदाकरिता जीएनएम पेक्षा अधिक गुणांच्या टक्केवारीनुसार शाश्नाच्या सूचनेनुसार अधिक गुण शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांची या पदाकरिता निवड केली जाईल..


वर देण्यात आलेल्या भरतीसाठी उमेदवारांचे वय किती असावे हे खाली पहा .

वरील महानगरपालिका भरती २०२४ च्या भरतीसाठी खुला वर्गाकरिता वयोमर्यादा हि १८ ते ३८ वर्षे दिली आहे तर इतर असलेल्या वर्गांकरिता वयोमर्यादा हि १८ वर्ष ते ४३ वर्ष दिली आहे .

वरील भरतीच्या अर्ज करण्याच्या महत्वाच्या तारखा ह्या खाली देण्यात आल्या आहेत त्या पहा .

  • वरील कोल्हापूर महानगरपालिका भरतीची अर्ज करण्याची सुरवात २८ सप्टेंबर २०२४ पासून सुरु झाली आहे
  • वर दिलेल्या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०२४ हि देण्यात आली आहे .

महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा ते पहा .

  • वरील महानगरपालिका भरतीसाठी उउमेद्वाराना ऑफ लाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे .
  • तसेच अर्ज करण्या आधी भरतीचे नोटीफिकेशन एकदा व्यवस्थित वाचून घ्यावे .
  • अर्जामध्ये जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे .
  • अर्ज हा शेवटच्या तारखेच्या आधी संकेतस्थळावर पाठवायचा आहे . उशिरा प्राप्त झालेले अर्ज नाकारले जाऊ शकतात . \
  • अर्ज हा दिलेल्या संबधित पत्यावर वेळेत पाठवायचा आहे .
  • अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०२४ अशी आहे .
  • अर्जाबरोबर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे पाठवायची आहेत .
  • अर्ज पाठविण्याचा पता : प्रतीसह मा. आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका यांचे नावे ब्युरो कार्यालय ,मुख्य इमारत भाऊ सिंगजी रोड ,सी वौंर्द कोल्हापूर
  • ह्या भरतीच्या संपूर्ण माहितीकरिता खाली दिलेली PDF जाहिरात वाचा

महत्वाच्या सूचना

वरील देण्यात आलेल्या महानगरपालिका संधर्भातील काही महत्वाच्या सूचना ह्या खाली दिल्या आहेत त्या पहा .

  • वरील महानगरपालिका भरती हि कंत्राटी स्वरुपाची आहे त्यामुळे ह्या भरतीमध्ये संबधित पदांवर कायम हक्क राहणार नाही हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे . तसेच शाश्नाच्या सेवेत सामाऊन घेणे किवा शाश्नाच्या सेवा संरक्षण याबाबतचा सुद्धा दावा करण्याचा कोणताही अधिकार असणार नाही .
  • तसेच पदांकरिता दिलेले मानधन हे एकत्रित मान धन असून त्या व्यतिरिक्त कोणतेही भत्ते दिले जाणार नाही .
  • या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना २९/०६/२०२५ या तारखे पर्यंत नेमणूक देण्यात येईल .
  • पात्र किवा अपात्र उमेदवारांच्या किवा निवड प्रक्रिया या बद्दलची सर्व माहिती कोल्हापूर महानगरपालिका https://web.kolhapurcorporation.gov.in/ या संकेतस्थळावर दिली जाईल . उमेदवारांशी स्वतंत्र पणे कुठलाही प्रकारचा संवाद केला जाणार नाही .
  • त्या पुढच्या कालावधीसाठी राज्य आरोग्य सोसायटी मुंबई यांच्याद्वारे अभियान सुरु ठेवणे आणि पदाना मान्यता मिळाल्यानंतर तसेच मागच्या काळात काम समाधानकारक असेल तर पुढच्या काळासाठी नेमणूक देण्य्यात येईल .
  • ज्या पदाकरिता उमेदवार अर्ज करणार आहे त्या पदासाठी उमेदवार शैक्षणिक अहर्ता पात्र केलेला असावा .
  • भरतीच्या वेळी उमेदवारांनी दिलेली माहिती हि खोटी किवा चुकीची माहिती असल्यास किवा माहिती लपवल्यास किवा अनुसूचित मार्गाचा अवलंब केल्यास त्याची नियुक्ती रद्द केली जाईल . कोणतीही पूर्व सूचना न देता . तसेच गरज भासल्यास प्रशासकीय किवा फौजदारी कारवाई केली जाईल .
  • तसेच भरतीची पदे, शैक्षणिक अहर्ता , उमेदवारांचे वय , अट व शर्ती मध्ये गरजेप्रमाणे बदल करता येऊ शकतो तसेच कोणतीही पूर्व सूचना न देता निवड प्रक्रिया मध्ये किवा निकष बदल करण्याचे सर्व अधिकार हे निवड समिती कोल्हापूर समिती महानगरपालिका यांच्याकडे आहेत .
  • उमेदवाराने निवड करण्याकरिता समितीवर प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्ष पणे कोणताही दबाव दाब आणला तर त्याला निवड प्रक्रियेमधून बाद केले जाईल .
  • उमेदवारांनी त्यांचा मोबाईल नंबर ईमेल आयडी सध्या चालू असलेले नंबर बरोबर लिहावेत अर्जामध्ये . आणि ते भरतीची प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहतील हि काळजी घ्यावी .
  • महारष्ट्र नागरी सेवा नियम २००५ नुसार लहान कुटुंबांचे प्रतिज्ञापत्र कागदपत्रांच्या पडताळणी वेळी सादर करणे आवश्यक आहे .
  • अर्जाबरोबर कागदपत्रांच्या साक्षांकित असलेल्या प्रती जोडाव्या .शैक्षणिक प्रमाणपत्र ,जन्माचा नोंदणी दाखला , तसेच पदानुसार संबधित कौन्सिलकडे नोंदणीचे प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र , अनुभव प्रमाणपत्र , पासपोर्ट साईजचे २ फोटो ,जातीचे प्रमाणपत्र , कागदपत्रे इत्यादी जोडावीत .
  • एक पेक्षा जास्त पदाकरिता उमेदवार अर्ज करणार असतील तर प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावेत .
  • तसेच वरील सर्व पदांच्या अर्जासाठी आवश्यक असलेले सर्व निर्णय हे समितीकडे असतील .

वर दिलेल्या भरतीच्या संबधित महत्वाच्या लिंक्स खाली पहा .

---Advertisement---

Related Post