केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB ) मध्ये रिक्त पदांच्या भरतीला सुरवात ! उमेदवारांनी करा ऑफलाईन अर्ज !

CPCB Bharti 2025 : उमेदवारांना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत भरतीची चांगली संधी आली आहे . या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ मध्ये नुकतीच भरतीच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे . त्यामुळे जे इच्छुक असणारे उमेदवार असतील त्यांच्याकडून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ कडून अर्ज मागविण्यात आले आहेत . या भरती मध्ये कायदा अधिकारी ,लेखाधिकारी ,सहाय्यक लेखाधिकारी ,वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक ,वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक ” या पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत . एकूण रिक्त असलेल्या जागांपैकी ०८ जागा भरल्या जाणार आहे . त्यासाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत . तसेच या भरतीसाठी उमेदवारांना कुठलीही अर्जाची फी भरावी लागणार नाही त्यामुळे सर्वच श्रेणीतील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात . नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर कुठेही आहे . या भरतीची अर्ज सुरु होण्याची तारीख ३ फेब्रुवारी २०२५ पासून आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० दिवस ( ०४ मार्च २०२५ ) अशी दिली आहे . त्यामुळे पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करताना दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधीच आपला अर्ज करावा . कारण उशिरा पोचलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही . या भरतीच्या आणखी माहिती करिता PDF जाहिरात वाचा .

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागाकडून सुरु झालेल्या या भरतीच्या प्रक्रियेमध्ये एकूण ०८ जागा भरल्या जाणार असून उमेदवारांना त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . या भरती मध्ये विविध पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत . जे उमेदवार ह्या भरतीसाठी अर्ज करणार आहेत . त्यांना आवश्यक असलेली भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे त्यामध्ये उमेदवारांना वयाची किती मर्यादा हवी किवा शैक्षणिक पात्रता , अर्जाची फी , नोकरी करण्याचे ठिकाण , अधिकृत वेबसाईट हि सर्व माहिती खालीलप्रमाणे पहा तसेच उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक असलेली आणि अधिसुचनेमध्ये सांगितल्या प्रमाणे सर्व कागदपत्रांच्या प्रती जोडायच्या आहेत . . तसेच उमेदवार अर्ज करताना अर्ज नीट भरावा आणि दिलेल्या संबधित पत्यावर पाठवावा . अर्जाचा पत्ता खाली दिला आहे . अधिक माहितीसाठी भरतीची मूळ जाहिरात वाचा .

भारताची केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB ) या विभागाची स्थापना हि १९७४ साली झाली आहे . हि पर्यावरण ,वन ,व हवामान बदल मंत्रालयातील (M.o.E.F.C.C ) मध्ये एक वैधानिक संस्था आहे . १९७४ मध्ये जल (प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंध ) कायदा १९७४ मध्ये त्याची स्थापना केली गेली . तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला (CPCB ) (प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंध ) कायदा १८८१ मध्ये कायदे व अधिकार देण्यात आले आहेत . केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे एक क्षेत्रीय रचना म्हणून काम करते व पर्यावरण (सरक्षण कायदा १९८६ च्या तरतुदीनुसार पर्यावरण आणि वन मंत्रालयाची तांत्रिक सेवा देण्याचे देखील काम करते . तसेच ते तांत्रिक साहय्य व मार्गदर्शन देऊन राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यामध्ये समन्वय साधण्याचे देखील काम करते .व त्यांच्यामधील वादांचे देखील निराकरण करण्याचे काम करते . केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हि देशामधील सर्व्वोच स्थान असलेली MoEFCC ची तांत्रिक शाखा आहे . तसेच ह्या मंडळाचे नेतृत्त्व भारत सरकारच्या मंत्रिमंडळच्या नियुक्त समितीने नेमलेल्या अध्यक्षाकडून करण्यात येते . केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सध्याचे असलेले अध्यक्ष हे श्री तन्मय कुमार आयएएस (ऑगस्ट २०२१ ) आहे . आणि त्याचे सदस्य सचिव कुमार शर्मा आहेत .)

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ चे मुख्य असलेले कार्यालय हे नवी दिल्ली याठिकाणी आहे . हे कार्यालय संचालनालये ,व प्रकल्प कार्यालय आहे . हे मंडळ पर्यावरणीय मुल्यांकन व संशोधन करते . तसेच आदिवासी व स्थानिक असलेल्या सरकारशी सल्लामसलत करून विविध पर्यावरणीय कायद्यामध्ये राष्ट्रीय मानके राखण्याची जबबदारी हि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची असते. तसेच पाणी व हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्याची देखील जबाबदारी त्याची असते . तसेच ते देखरेख चा डेटा राखते . तसेच हि संस्था उद्यौग व सरकारच्या सर्व स्तरवर वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयसेवी प्रदूषण प्रतिबंध कार्यक्रमा अंतगर्त व उर्जा संवर्धन प्रयत्नामध्ये सुद्धा काम करते . .त्याचप्रमाणे ते ते केंद्र सरकारला पाणी व वायू , प्रदूषण थांब्व्न्याकारिता व नियंत्रित करण्याचा सल्ला देते .तसेच ते पर्यावरनातील प्रदूषण थांबवण्यासाठी व नियन्त्र्नाकारिता कायदे लागू करण्याकरिता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाल व त्याचे समकक्ष असलेले राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एसपीबी ) जबाबदार आहे .)

  • पदांच्या रिक्त जागा – ०८ जागा
  • पदांची नावे – कायदा अधिकारी ,लेखाधिकारी ,सहाय्यक लेखाधिकारी ,वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक ,वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – (शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदाच्या पात्रतेवर अवलंबून आहे . त्याकरिता PDF जाहिरातीचे वाचन करा .))
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
  • वयाची मर्यादा – ५६ वर्षे
  • अर्जाची पद्धत – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० दिवस ( ०४ मार्च २०२५ )
  • अर्ज पाठवायचा पत्ता – प्रशाशकीय अधिकारी (भरती ) ,केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ परिवेशन भवन पूर्व अर्जुन नगर शाहदरा , दिल्ली -११००३२
  • अधिकृत वेबसाईट – www.cpcb.nic.in

या भरती मध्ये एकूण पदांच्या ०८ विविध जागा भरल्या जाणार असून त्यासाठी खालीलप्रमाणे जागा बघा .

पदांची नावे पदांच्या जागा
कायदा अधिकारी०१ जागा
लेखाधिकारी०१ जागा
सहाय्यक लेखाधिकारी
०१ जागा
वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक ०२ जागा
,वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक०३ जागा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिसुचनेमध्ये सांगितल्या प्रमाणे खाली दिलेल्या प्रमाणे वेतनश्रेणी दिली जाईल .

पदांची नावे वेतनश्रेणी (पगार )
कायदा अधिकारीलेव्हल – ११ in Pay matrix रुपये . ६७,७००- २,०८, ७००)
लेखाधिकारीलेव्हल – ७ in Pay matrix रुपये ,४४,९००- १,४२,४००)
सहाय्यक लेखाधिकारीलेव्हल – ७ in Pay matrix रुपये ,४४,९००- १,४२,४००)
वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक लेव्हल – ७ in Pay matrix रुपये ,४४,९००- १,४२,४००)
,वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकलेव्हल – ६ in Pay matrix रुपये , ३५,४००- १,१२,४००)

पदांची नावे शैक्षणिक मर्यादा वयोमर्यादा
कायदा अधिकारीया पदाकरिता उमेदवाराने कायद्या मधील बॅचलर पदवी मिळवली असावी आणि उमेदवाराला त्या संबधित कामाचा ७ वर्षाचा अनुभव असावा . ५६ वर्षे
लेखाधिकारी या पदासाठी उमेदवाराने वाणिज्य शाखेतील पदवी मिळवली असावी आणि अकौन्तंस ,आणि ऑडित व फायनान्सियल मॅनेजमेंट मध्ये ५ वर्षाचा अनुभव असावा . ५६ वर्षे
सहाय्यक लेखाधिकारी या पदासाठी वाणिज्य शाखेतील पदवी प्राप्त केली असावी . आणि संबधित कामाचा कमीत कमी ५ वर्षाचा कामाचा अनुभव असायला हवा .५६ वर्षे
वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक इंतुयमेंतेषशन ,इलेक्ट्रोनिक्स ,इलेक्ट्रीकल व मेकॅनिकल इंजिनियरिंग मध्ये डिप्लोमा केला असावा .
५६ वर्षे
,वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यकया पदाकरिता विज्ञान विषयामध्ये पदव्युत्तर पदवी व संबधित असलेल्या कामचा कमीत कमी २ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे .५६ वर्षे

  • केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया हि उमेदवारांची कौश्यल्य चाचणी आणि मुलाखत यावर अवलंबून आहे . तसेच उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी केली जाईल .आणि उमेदवारांची निवड हि अंतिम निवड गुणवंता आणि पात्रता या निकषावर अवलंबून आहे .
  • कौश्यल्य चाचणी
  • मुलाखत
  • कागदपत्रांची पडताळणी
  • गुणवत्ता

वरील दिलेल्या सर्व निकषामध्ये पात्र ठरणारा आणि अधिसुचनेमध्ये दिलेल्या सर्व अति आणि नियमांची पात्रता पूर्ण करणारा उमेदवार या भरतीच्या निवडीकरिता पात्र ठरतील .

  • वर देण्यात आलेल्या भरती मध्ये अनेक विविध जागा भरल्या जाणार असून उमेदवारांना अर्ज करण्याकरिता महत्वच्या तारखा ह्या खाली दिल्या आहेत त्या पहा .
इवेंतारखा
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२५ ची अर्ज सुरु होण्याची तारीख ३ फेब्रुवारी २०२५
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ची अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०२५

  • वरील Central Pollution Control Board अंतर्गत सुरु झालेल्या या नवीन भरती पर्क्रीयेमध्ये इच्छुक उमेदवारांनी अर्ज कसा करावा ते पुढीलप्रमाणे बघा . अधिक माहिती मिळवण्यासाठी PDF जाहिरातीचे वाचन करा .
  • वरील भरतीचा अर्ज हा ऑफ लाईन पद्धतीने करायचा आहे .
  • अर्ज करण्याआधी भरतीचे नोटिफिकेशन एकदा नीट वाचून घ्या .
  • अर्ज करण्याच्या सर्व सविस्तर सूचना या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत .
  • उमेदवारांनी अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती भरा .
  • अर्जाबरोबर सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडा .
  • अर्ज हेदिलेल्या तारखेच्या आधीच दिलेल्या संबधित पत्यावर पाठवून द्या .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ मार्च २०२५ अशी दिली आहे .
  • या भरतीची अधिक माहिती वाचण्यासाठी pdf जाहिरात पहा .
  • सर्वात आधी अर्ज करण्याचा फॉर्म डाउनलोड करा . अधिकृत वेबसाईट www.cpcb.nic.in वर जाऊन अर्जाचा फॉर्म डाउनलोड करून घ्या .
  • नंतर सर्व माहिती नीट भरा . त्यामध्ये खाली दिलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडा .
  • वयाचे [प्रमाणपत्र
  • कामाचा अनुभव प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • मागच्या ५ वर्षांचे APAR कागदपत्रे सचोटी प्रमाणपत्रे हि सर्व कागदपत्रे खाली दिलेल्या पत्यावर पाठून द्या .
  • अर्ज पाठवायचा पत्ता – प्रशाशकीय अधिकारी (भरती ) ,केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ परिवेशन भवन पूर्व अर्जुन नगर शाहदरा , दिल्ली -११००३२

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ २०२५ या भरतीचा अर्ज करताना काही महत्वच्या लिंक्स खालीलप्रमाणे पहा .अधिक माहितीसाठी PDF जाहिरात वाचा .

  • अधिकृत वेबसाईट लिंक www.cpcb.nic.in

More Read