---Advertisement---

चंद्रपूर जिल्हा बँकेमध्ये निघाली आहे लिपिक आणि शिपाई पदांची भरती !उमेदवारांना बँकेतील नोकरीसाठी उत्तम संधी !

By dhanashribagad6

Updated On:

Chandrapur DCC Bank Rcruitment 2024
---Advertisement---

Chandrapur DCC Bank Rcruitment 2024 : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये भरतीची नवीन जाहिरात सुरु . या सहकारी बनके अंतर्गत भरली जाणार आहेत . ३५८ रिक्त पदे त्याकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत . अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे . या भरती मध्ये लिपिक आणी शिपाई या रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत .यामध्ये लिपिक पदाच्या २६१ जागा भरल्या जाणार आहेत तर ९७ जागा ह्या शिपाई पदाच्या भरल्या जाणार आहेत . त्यामुळे जे उमेदवार या भरतीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आहेत आणि ज्यांची बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा०८ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजल्यापासून अर्ज भरण्यास सुरवात होईल ते तारीख १९ ऑक्टोबर२०२४ रात्री १२.०० वाजता अर्ज भरण्याचीप्रक्रिया बंद होईल त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखा आणि वेळ लक्षात ठेऊन लवकर अर्ज करावे . आहे त्यांनी आपले अर्ज दिलेल्या संकेत स्थळावरून पाठवायचे आहेत . तसेच या भरतीची सरळ सेवा भरती केली जाणार आहे . तसेच या भरतीची अधिक माहिती मिळविण्यासाठी उमेदवारांनी कृपया PDF जाहिरात वाचून घ्यावी .

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये सुरु झालेल्या या भरतीमध्ये शिपाय आणि लिपिक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत . या भरतीमध्ये अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत . त्यामुळे या भरतीसाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत . त्याकरिता असणारी सर्व माहिती उमेदवाराची वयोमर्यादा ,नोकरी करण्याचे ठिकाण ,अर्ज शुल्क ,शैक्षणिक पात्रता ,तसेच वेबसाईट लिंक या सर्व माहितीचा सविस्तर तपशील हा खाली दिला आहे तो पाहावा . आणि अर्ज हा व्यवस्थित भरून पाठवावा .अर्जामध्ये कसलीही चूक करू नयेनाहीतर अश्या अर्जांचा विचार केला जाणार नाही .

आणखी वाचा

  • पदांची जागा – ३५८ जागा
  • पदांचे नाव – लिपिक आणि शिपाई
  • अर्ज शुल्क – रुपये ५६०/-
  • नोकरी करण्याचे ठिकाण –
  • वयाची अट- १८ वर्षे ४५ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ ऑक्टोबर २०२४
  • वेबसाईट लिंक – https://cdccbank.co.in/
पदाचे नाव पदांच्या जागा
लिपिक २६१ जागा
शिपाई ९७ जागा

या भरती मध्ये लिपिक आणि शिपाई पदासाठी की शैक्षणिक अहर्ता असली पाहिजे ते पहा .

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपिक उमेदवार हा कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेला असावा . कोण्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किवा संस्थेकडून तसेच एमएससीआय टी परीक्षा पास असावा . किवा वाणिज्य शाखेतून पदवी मिळवलेला असावा . पदवी /पदवीधर व बँकिंग क्षेत्रातील लिपिक व व वरिष्ठ श्रेणी मधील कामाचा अनुभव असावा .त्याला प्राधान्य दिले जाईल .तसेच मराठी ,इंग्रजी टंकलेखन लाघुलेख्नाची परीक्षा पास असल्यास त्या उमेदवार आधी प्राधान्य देण्यात येईल .
शिपाई या पदाकरिता उमेदवार हा कमीत कमी १० वी पास असणे आवश्यक आहे .

अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किती वेतन/पगार दिले जाईल ते पहा .

पदाचे नाव वेतनश्रेणी /पगार
लिपिक २७५०-२२५ -३८७५-२७५-५२५०-३२५-६८७५-४००-८८७५-४५०-१११२५-५००-१३६२५
शिपाई २३१०-१६५-३१३५-२००-४१३५-२५०-५३८५-३००-६८८५-३५०-८६३५

वर दिलेल्या चंद्रपूर सहकारी बँक भरतीसाठी उमेद्वारंची निवड कशी केली जाईल . ते खाली दिली आहे ती पहा .

वरील भरती अंतर्गत उमेदवारांची वैयक्तिक मुलाखती , परीक्षा तसेच कागदपत्रांची छाननी केली जाईल . .

मुलाखत : यामध्ये कागदपत्रे पडताळणी केल्यांनतर पात्र असणारा उमेदवाराची बँकेकडून मुलाखती घेतली जाईल यामध्ये हि मुलाखत १० गुणाची असणार आहे जो उमेदवार या मुलाखती साठी हजर राहणार नाही तो शेवटच्या निवडीकरिता पत्र असणार नाही .तसेच लिपिक पदाकरिता सुद्धा १० गुणांची मुलाखत होईल .त्यामधील ५ गुण हे उमेवारांच्या शैक्षणिक पात्रते नुसार दिले जाईल .

परीक्षा : यामध्ये उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल ऑन लाईन परीक्षा मधील गुण व मुलाखतीचे गुण या दोघांची बेरीज करून १०० गुणांपैकी मिळालेल्या गुनामधून उमेदवारांची अंतिम निवड सूची आणि प्रतीक्षा यादी तयार केली जाईल .तसेच लिपिक आणि शिपाई पदाच्या श्रेणी मधील पदांची संख्या विचारत घेतली तर अंतिम निवड सूची मध्ये समान गुण मिळाल्यास महाराष्ट शाशनाच्या ठरवलेल्या नियमानुसार उमेदवारांची निवड केली जाईल . तसेच शेवटच्या निवड यादी नुसार आणि गुंवाता यादी नुसार पत्र असलेल्या उमेदवारांना बँकेच्या लिपिक आणि शिपाई या पदाकरिता तात्पुरत्या स्वरुपाची नियुक्ती देण्यात येईल . .यामध्ये कोणतीही पूर्व तपासणी /कागद पात्रांची तपासणी न करता परीक्षा घेतली जाणार असल्यामुळे परीक्ष्मध्ये मिळालेले गुण हे उमेदवारांच्या शेवटच्या निवडीसाठी पात्र असणार नाहीत

कागदपत्रे छाननी : अधिसूचने मध्ये सांगितल्याप्रमाणे उमेदवारांच्या अंतिम निवडीकरिता कागदपत्रांची सखोल छाननी करण्यात येईल .यामध्ये अपात्र ठरणाऱ्या उमेदवारास निवड प्रकारीये मधून बाद केले जाईल .

तसेच निवड केलेल्या उमेदवारांना १ वर्षाकरिता परीक्षविधीन ( प्रोबेशनरी ) सेवेकरिता नेमण्यात येईल .त्याचप्रमाणे निवड झालेल्या उमेदवारांना लिपिक आणि शिपाई ( प्रोबेशनरी) या काळामध्ये बँकेने ठरवलेल्या निर्णयानुसार दर महिन्याचा पगार हा एकत्रित दिला जाईल .तसेच अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना बँकेमध्ये ३ वर्षे काम करण्याकरिता तसे करार पत्र किवा हमी पत्र करून देणे बंधन कारक असेल .

चंद्रपूर सहकारी बँक भरती २०२४ च्या भरती साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय /वयोमर्यादा किती असावी ते खालील माहितीमध्ये पहा .

चंद्रपूर सहकारी बँक भरती २०२४ च्या भरती अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय हे लिपिक पदासाठी कमीत कमी २१ वर्षे आणि जास्तीत जास्त ३८ वर्षे असले पाहिजे त्यापेक्षा जास्त नसावे . आणि शिपाई पदाकरिता वयाची अट कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त ३८ वर्षे इतके दिले आहे . त्यापेक्षा जास्त नसले पाहिजे .

चंद्रपूर सहकारी बँक भरती २०२४ च्या भरती मध्ये अर्ज करताना उमेदवारांना अर्जासोबत जोडावी लागणारी आवश्यक कागदपत्रे /प्रमाणपत्रे पुढीलप्रमाणे पहा .

  • शैक्षणिक पात्रतेचा पुरावा – लिपिक पदासाठी पदवी चे प्रमाणपत्र आणि शिपाई पदासाठी -१० वी चे प्रमाणपत्र
  • जन्म दाखला पुरावा – १० वी प्रमाणपत्र
  • MSCIT किवा समकक्ष प्रमाणपत्र ( लिपिक पदाकरिता )
  • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास )
  • टंकलेखन प्रमाणपत्र (असल्यास )
  • लघुलेखन प्रमाणपत्र (असल्यास )
  • विवाहित महिलाच्या नावामध्ये बदल झाल्याचा पुरावा -महाराष्ट्र शाषन प्रमाणपत्र
  • जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा प्रकल्प ग्रस्त दाखला -(असल्यास)

चंद्रपूर सहकारी बँक भरती २०२४ च्या भरतीसाठी अर्ज करताना आवश्यक महत्वाच्या तारखा पुढील पहा .

  • चंद्रपूर सहकारी बँक भरती २०२४ चा भरती अर्ज सुरु होण्याची तारीख ०८ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता सुरु होईल .
  • चंद्रपूर सहकारी बँक भरती २०२४ चा अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२४ रात्री १२.०० वाजता बंद होईल .

अर्ज करताना उमेदवारांना परीक्षा शुल्क किती भरावी लागेल त्याबद्ल्ची माहिती खाली पहा . .

  • चंद्रपूर सहकारी बँक भरती २०२४ चा भरती करिता उमेवाराना परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे . त्याशिवाय अर्ज स्वीकारले जाणार नाही तसेच हे परीक्षा शुल्क आणि अर्ज ऑन लाईन पद्धतीनेच करायचे आहेत अन्य इतर कोणतीही पद्धत स्वीकारली जाणार नाही प्रत्यक्ष बँकेच्या कार्यालयात अर्ज आणून दिले तरी घेतले जाणार नाही .याची उमेदवारांनी नोंद घ्यावी .
  • परीक्षा शुल्क – रुपये .५६०.५०/-
  • तसेच हे अर्ज शुल्क नापरातावा आहे . एकदा भरल्यानंतर पुन्हा मिळणार नाही .

वर देण्यात आलेल्या भरती संदर्भातील अधिसुच्नेमध्ये दिलेल्या आवश्यक सूचना खालीलप्रमाणे पहा .

  • वरील सहकारी बँक भरतीचा अर्ज करताना उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करावा .
  • अर्ज करण्याची सर्व सविस्तर माहिती संकेत स्थळावर दिली आहे .
  • अर्जामध्ये सर्व माहिती खरी आणि व्यवस्थित लिहायची आहे . खोटी माहिती लिहू नये तसे आढळून आल्यास त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल .
  • अर्जामध्ये शैक्षणिक पात्रता ,वयोमर्यादा ,अनुभव इतर सर्व माहिती व्यवस्थित भरावा अर्जामध्ये काही माहिती राहिल्यास किवा चूक झाल्यास अर्ज नाकारला जाईल .
  • अर्जासोबत आदिसुच्नेमध्ये दिल्या प्रमाणे सर्व कागदपत्रे /प्रती जोडायच्या आहेत .
  • अर्ज करताना अर्ज शुल्क भरावे आणि ते ऑन लाईन पद्धतीनेच इतर दुसऱ्या कोणत्याही मार्गाचा वापर करू नये .
  • उमेदवारांनी चालू मोबाईल नबर आणि ई- मेल आयडी अर्जामध्ये नमूद करावी म्हणजे उमेदवाराला बँकेकडून दिली जाणारी माहिती किवा सूचना वेळोवेळी मिळतील .
  • उमेदवारांनी ऑन लाईन पद्धतीने अर्ज करताना स्वतचा पासपोर्ट साईजचा फोटो स्कॅनकेलेला आणि सही स्कॅन केलेली JPG/PNG प्रकारची दिलेल्या वेबसाईट लिंक वर अपलोड करावी .
  • उमेदवारांनी ऑन लाईन पद्धतीने अर्ज करताना आधार कार्ड स्कॅन करून दिलेल्या वेबसाईट लिंकवर अपलोड करावे .
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२४ आहे . या तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

वरील सहकारी बँक २०२४ च्या भरतीसाठी लागणारी महत्वाच्या लिंक्स पहा .

---Advertisement---

Related Post