---Advertisement---

आदिवासी विकास विभाग अमरावती मध्ये एकूण ११२ रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु ! उमेदवारांनी पहा कसा करावा अर्ज !

By dhanashribagad6

Updated On:

Adivasi Vikas Vibhag Amravarti 2024
---Advertisement---

Adivasi Vikas Vibhag Amravarti 2024 : आदिवासी विकास विभाग अमरावती मध्ये नुकतीच निघाली नवीन भरती उमेदवारांनी जाणून घ्या कसा करावा अर्ज . या भरती अंतर्गत निघालेल्या भरती करिता अनेक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार असून यामध्ये विविध पदांसाठी जागा निघाल्या आहेत जे उमेदवार अर्ज करण्यास इच्छुक आहेत किवा अर्ज करण्यास दिलेल्या पदानुसार पात्र ठरत असतील त्यांनी त्वरित आपले अर्ज दिलेल्या संबधित वेबसाईट वर जाऊन करून घ्यावे . या भरती मध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक ,संशोधन सहाय्यक ,उपलेखापाल/मुख्य लिपिक , वरिष्ठ लिपिक /सांखिकी सहाय्यक ,लघुटंकलेखक ,गृहपाल (पुरुष ),गृहपाल (स्त्री ), ग्रंथपाल ,कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी “ हि पदे भरली जाणार आहेत . तसेच या पदांच्या एकूण ११२ रिक्त जागा भरण्यात येणार आहे . त्याकरिता पात्र उमेदवारांकडून आदिवासी विकास विभाग ने अर्ज मागविले आहेत . आणि अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत . या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख हि २ नोव्हेंबर २०२४ अशी दिली आहे . उमेदवारांनी या दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आधी आपले अर्ज भरायचे आहेत .

आदिवासी विकास विभाग अमरावती मध्ये २०२४ च्या भरतीची सविस्तर माहिती पाहण्यासठी खाली दिलेली PDF जाहिरात वाचा त्यामध्ये भरतीचा अर्ज करण्याकरिता लागणारे उमेदवाराचे वय , शैक्षणिक अट, अर्जाची फी , नोकरीचे ठिकाण , अर्ज कसा करावा या बद्दलची सर्व माहिती मिळेल . आदिवासी विकास विभाग अमरावती मध्ये २०२४ च्या ह्या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली असून तिची अर्ज करण्याची लास्ट दिनांक २ नोव्हेंबर २०२४ देण्यात आली त्यामुळे उमेदवारांनी लवकर आपले अर्ज भरून घ्यावेत . तसेच अर्ज करताना कसलीही खोटी किवा चुकीची माहिती अर्जामध्ये भरू नये नाहीरात अर्ज नाकारले जातील . बरोबर माहिती लिहावी आणि अपूर्ण माहिती लिहू नये .आणि अर्ज वेबसाईट लिंक https://tribal.maharashtra.gov.in/ या वेबसाईट लिंकवर जाऊन भरून पाठवावा .

Read More

  • पदांच्या जागा ११२ रिक्त जागा
  • पदांची नावे – वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक ,संशोधन सहाय्यक ,उपलेखापाल/मुख्य लिपिक , वरिष्ठ लिपिक /सांखिकी सहाय्यक ,लघुटंकलेखक ,गृहपाल (पुरुष ),गृहपाल (स्त्री ), ग्रंथपाल ,कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
  • शैक्षणिक अहर्ता – शैक्षणिक पात्रता हि दिलेल्या पदांच्या [पत्रात वर अवलंबून आहे .
  • नोकरी करण्याचे ठिकाण – अमरावती
  • वयाची मर्यादा -१८ वर्षे ते ३८ वर्षे
  • अर्जाची फी –
    • राखीव प्रवर्ग – ST/SC/PWD – ९०० रुपये
    • खुला वर्गआणि इतर -१०००/- रुपये
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ नोव्हेंबर २०२४
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन पद्धत
  • वेबसाईट लिंक – https://tribal.maharashtra.gov.in/
रिक्त पदांची नावे पदांच्या रिक्त जागा
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक४ जागा
संशोधन सहाय्यक५ जागा
,उपलेखापाल/मुख्य लिपिक ८ जागा
वरिष्ठ लिपिक /सांखिकी सहाय्यक४३ जागा
लघुटंकलेखक३जागा
गृहपाल (पुरुष )१३ जागा
गृहपाल (स्त्री ),८ जागा
अधीक्षक स्त्री ३ जागा
ग्रंथपाल१ जागा
,कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी२४ जागा
रिक्त पदांची नावे वेतन/पगार
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकरुपये . ३८६००- ते १२२८००/-
संशोधन सहाय्यकरुपये . ३८६००- ते १२२८००/-
,उपलेखापाल/मुख्य लिपिक रुपये . ३५४००/- ते ११२४००/-
वरिष्ठ लिपिक /सांखिकी सहाय्यकरुपये .२५५०० ते ८११००/-
लघुटंकलेखकरुपये . २५५०० ते ८११००/-
गृहपाल (पुरुष )रुपये . ३८६००- ते १२२८००/-
गृहपाल (स्त्री ),रुपये .३८६००- ते १२२८००/-
अधीक्षक स्त्री रुपये . २५५०० ते ८११००/-
ग्रंथपालरुपये . २५५०० ते ८११००/-
,कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीरुपये –
  • वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक : या पदाकरिता मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कला,विज्ञान ,वाणिज्य मध्ये दिव्तीय श्रेणीतील पदवी प्राप्त केली असावी किवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण किवा शाररीक शिक्षणशास्त्र पदवी मिळवली असावी . तसेच संस्थात्मक व्यवस्थापन ,शैक्षणिक प्रशासन ,तपासणी व सवयी आणि खेळण्याकरिता योग्य सवयी आणि अनुभव असलेले जे उमेदवार असतील त्यांना सर्वात आधी प्राधान्य दिले जाईल .
  • संशोधन सहाय्यक : या यामध्ये जे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी प्राप्त केलेले आहेत पण अर्थशास्त्र ,गणित व वाणिज्य आणि सांखिकी शास्त्र यामधील कुठल्याही विषयामध्ये पदवी प्राप्त केलेले असणाऱ्या उमेदवारांना सर्वात आधी प्राधान्य दिले जाईल .
  • ,उपलेखापाल/मुख्य लिपिक : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी मिळवली आहे पण पद्वूत्त्र पदवी प्राप्त केलेल्या उमेदवाराना आधी प्राधान्य दिले जाईल .
  • वरिष्ठ लिपिक /सांखिकी सहाय्यक : या यामध्ये जे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी प्राप्त केलेले आहेत पण अर्थशास्त्र ,गणित व वाणिज्य आणि सांखिकी शास्त्र यामधील कुठल्याही विषयामध्ये पदवी प्राप्त केलेले असणाऱ्या उमेदवारांना नेमण्यास सर्वात आधी प्राधान्य दिले जाईल
  • लघुटंकलेखक : या पदाकरिता उमेदवाराने माध्यमिक शाळेत प्रमाणपत्र पास केले असावे . किवा शासनमान्य समतुल्य परीक्षा पास केली असावी . आणि ज्या उमेदवाराचा लघुलेखन करण्याचा वेग हा ८० शब्द प्रती मिनिट व इंग्लिश टंकलेखनाचा वेग हा कमीत कमी ४० शब्द प्रती मिनिट व मराठी टंकलेखन याचा वेग ३० शब्द प्रती मिनिट या अह्र्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र प्राप्त करत असेल (महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किवा ओउदोगिक प्रशिक्षण संस्था यांच्याकडचे प्रमाणपत्र )
  • गृहपाल (पुरुष ) : या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून समाज कार्य किवा समाज कल्याण प्रशासन किवा आदिवासी कल्याण किवा आदिवासी कल्याण प्रशासन शाकेमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदव्युत्तर पदवी मिळवली असावी .
  • गृहपाल (स्त्री ), : यामध्ये उमेदवाराने समाज कल्याण प्रशासन किवा आदिवासी कल्याण किवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदव्युत्तर पदवी मिळवली असावी .
  • अधीक्षक स्त्री : यामध्ये उमेदवाराने समाज कल्याण किवा समाज कार्य प्रशासन किवा आदिवासी कल्याण किवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदव्युत्तर पदवी मिळवली असावी
  • ग्रंथपाल: या पदासाठी ज्या उमेदवाराने माध्यमिक शाळेतील परीक्षा प्रमाणपत्र पास केले आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यातले शाषन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे किवा संस्थेचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे . आणिग्रंथालय शास्त्र मधले पदविका प्राप्त करणारा व २ वर्षाचा ग्रंथालय कामाचा अनुभव असणारा त्यापेक्षा कमी अनुभव नसणारा उमेदवार याला प्राधान्य दिले जाईल .
  • कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी : या पदाकरिता उमेदवार हा कुठल्याही विद्याशाखा मधील पदवी पास असलेला असावा किवा याबद्दल शाश्नाने त्याच्याशी समतुल्य असलेली इतर कोणतीही शैक्षणिक पात्रता असलेला असावा .

निवड प्रक्रिया

वरील भरतीसाठी निवड प्रक्रिया हि खालीलप्रमाणे होईल .

१. यामध्ये सर्व पदांची परीक्षा हि मराठीमध्ये घेण्यात येईल ऑनलाईन पद्धतीने परीक्षा हि राज्याच्या जिल्ह्यातील मुख्यालयी ठिकाणी घेण्यात येईल .

२.ऑनलाईन पद्धतीने संगणक आधारित घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ते नुसार उमेदवारांची निवड केली जाईल .तसेच गुणवत्ते यादीमध्ये येण्याकरिता उमेदवाराने कमीत कमी ४५% गुण मिळवणे आवश्यक आहे .

३. संगणकाच्या आधारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये असणारे प्रश्न हे बहु पर्यायी व वस्तूनिष्ठ स्वरूपाचे असतील आणि प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी २ गुण असतील .

४. तसेच ज्या पदाकरिता शाररीक चाचणी व व्यवसायिक चाचणी याची गरज नाही त्यांची ऑन लाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल .यामध्येगणित ,इंग्रजी ,मराठी बौद्धिक चाचणी ,सामान्य ज्ञान या विषयांना प्रत्येकी ५० गुण ठेऊन परीक्षा हि २०० गुणांची असेल .आणि परीक्षेचा वेळ हा २ तासाचा असेल .

वर दिलेल्या भरती अंतर्गत उमेदवारांची वयोमर्यादा हि कमीत कमी १८ वर्षे असावी आणिजास्तीत जास्त ४३ वर्षे इतकी असावी त्यापेक्षा जास्त नसावी .

  1. परीक्षेकरिता ऑन लाईन पद्धतीने केल्या असलेल्या आवेदन पत्राची प्रत
  2. शैक्षणिक पुराव्याची कागदपत्रे
  3. संगणक परीक्षा पास झाल्याचे प्रमाणपत्र
  4. परीक्षा शुल्क भरलेल्या पावतीची प्रत
  5. जातीचे प्रमाणपत्र
  6. जात वैधता असलेले प्रमाणपत्र
  7. नॉनक्रिमी लेयर /आणि इतर आवश्यक कागदपत्रे
  • आमागास वर्गासाठी परीक्षा शुल्क रुपये .१०००/- आहे तर
  • मागासवर्ग /माजी सैनिक /अनाथ /दिव्यांग रुपये . ९००/-
  • आणि भरलेली परीक्षा फी हि ना परतावा असेल हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे .
  • वर दिलेल्या भरतीसाठी ऑन लाईन पद्धतीने अर्ज सुरु होण्याची तारीख – १२/१०/२०२४ वेळ १५.०० वाजल्यापासून
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख – २.११.२०२४ वेळ २३.५५ वाजे पर्यंत असेल .
  • ऑनलाईन परीक्षेची तारीख – कळविण्यात येईल
  • वर दिलेल्या भरतीसाठी उमेद्वारणी ओं लाईन स्वरूपात अर्ज करावा .
  • अर्ज हा दिलेल्या संबधित लिंकवरूनच करावा .
  • अर्जासोबत अधिसुच्नेमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे जोडावी .
  • जे उमेदवार एक पेक्षा जास्त अर्ज करणार आहेत त्यांनी प्रत्येक अर्ज हा स्वतंत्र करावा आणि अर्ज शुल्क भरावे .अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे नाहीतर अर्ज विचारात घेतला जाणार नाही .
  • तसेच चालू मोबाईल नंबर आणि वैद्य असलेली ई- मेल आयडी उमेदवाराने देणे आवश्यक आहे .
  • उमेदवाराची सही ,फोटो ,आणि अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे नाहीतर अर्ज स्वीकारला जाणार नाही .
  • अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरावी . अपूर्ण माहिती किवा चुकीची माहिती असलेला अर्ज नाकारला जाईल .
  • अधिक माहिती करिता खाली देण्यात आलेली PDF जाहिरात वाचा .

---Advertisement---

Related Post