---Advertisement---

मुंबई रेल कॉर्पोरेशन मध्ये भरतीची नवीन जाहिरात ! उमेदवारांनी करा ऑनलाईन अर्ज !

By dhanashribagad6

Updated On:

MMRCL Recruitment 2024
---Advertisement---

MMRCL Recruitment 2024 : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ( Mumbai Metro Rail Corporation Limited ) मध्ये होणार आहे रिक्त पदांवर भरती या भरतीमध्ये एकूण ११ जागा रिक्त असून त्या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ( Mumbai Metro Rail Corporation Limited ) अर्ज मागवले आहेत . अर्ज करण्याची पद्धत हि ऑन लाईन असून उमेदवारांनी दिलेल्या संबधित वेबसाईट वरून आपले अर्ज भरून घ्यायचे आहेत . तसेच या भरती अंतर्गत डेप्युटी जनरल मॅनेजर असिस्टंट जनरल मॅनेजर , असिस्टंट मॅनेजर ,उप अभियंता ( सुरक्षा ), कनिष्ठ अभियंता – II (RS) ” हि पदे भरली जाणार आहेत . त्यामुळे जे उमेदवार या भरती साठी इच्छुक आहेत त्यांनी त्वरित आपले अर्ज दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत भरायचे आहेत . या भरतीचे अर्ज करण्याची शेवटची तारीख हि १२ ऑक्टोबर २०२४ अशी दिली आहे . तसेच तुम्हाला जर या भरतीची संपूर्ण माहिती पहायची असेल तर शेवटी देण्यात आलेली PDF जाहिरात वाचा त्यामध्ये भरतीची सविस्तर माहिती दिली आहे .

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ( Mumbai Metro Rail Corporation Limited ) २०२४ च्या भरतीची सविस्तर माहिती पाहण्यासठी खाली दिलेली PDF जाहिरात वाचा त्यामध्ये भरतीचा अर्ज करण्याकरिता लागणारे उमेदवाराचे वय , शैक्षणिक अट, अर्जाची फी , नोकरीचे ठिकाण , अर्ज कसा करावा या बद्दलची सर्व माहिती मिळेल . मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ( Mumbai Metro Rail Corporation Limited ) २०२४ च्या ह्या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली असून तिची अर्ज करण्याची लास्ट दिनांक १२ ऑक्टोबर २०२४ देण्यात आली त्यामुळे उमेदवारांनी लवकर आपले अर्ज भरून घ्यावेत . तसेच अर्ज करताना कसलीही खोटी किवा चुकीची माहिती अर्जामध्ये भरू नये नाहीरात अर्ज नाकारले जातील . बरोबर माहिती लिहावी आणि अपूर्ण माहिती लिहू नये .आणि अर्ज वेबसाईट लिंक -www.mmrcl.com या वेबसाईट लिंकवर जाऊन भरून पाठवावा .

  • पद संख्या – ११ जागा
  • पदाचे नाव – डेप्युटी जनरल मॅनेजर असिस्टंट जनरल मॅनेजर , असिस्टंट मॅनेजर ,उप अभियंता ( सुरक्षा ), कनिष्ठ अभियंता – II (RS)
  • शिक्षणाची अट- शिक्षणाची अट हि प्रत्येक दिलेल्या पदानुसार आहे .
  • वयाची अट- ४० वर्षे
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
  • नोकरीचे ठिकाण – मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑक्टोबर २०२४
  • वेबसाईट लिंक -www.mmrcl.com

Most Read

पदांची नावे पदांच्या जागा
डेप्युटी जनरल मॅनेजर ०२ जागा
असिस्टंट जनरल मॅनेजर०५ जागा
असिस्टंट मॅनेजर ०२ जागा
उप अभियंता ( सुरक्षा )०१ जागा
कनिष्ठ अभियंता – II (RS)०१ जागा

वरील भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना वेतनश्रेणी किती असेल ते खालीलप्रमाणे पहा .

पदांची नावे पगार /वेतनश्रेणी
डेप्युटी जनरल मॅनेजर रुपये . ८०,००० ते २,२००००/- (IDA Pay scale
असिस्टंट जनरल मॅनेजररुपये .७०.००० ते २,०००००/- (IDA Pay scale )
असिस्टंट मॅनेजर रुपये . ५०,०००/- ते १,६००००/- (IDA Pay scale )
उप अभियंता ( सुरक्षा )रुपये . ५०,०००/- ते १,६००००/- (IDA Pay scale )
कनिष्ठ अभियंता – II (RS)रुपये .३५,२८०/- ते ६७,९२०/- (IDA Pay scale )

वर देण्यात आलेल्या MMRCL च्या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अहर्ता खालील प्रमाणे पहा .

  • डेप्युटी जनरल मॅनेजर : मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठ/महाविद्यालयातून पूर्णवेळ पदवी/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा.देखील बॅचलर पदवी मिळवली असावी .
  • अनुभव :- सिनियर स्केल अधिकारी म्हणून कमीत कमी ०६ वर्षाचा अनुभव असावा ग्रुप “अ ” मध्ये आणि २ वर्षे सेवा हि इष्ट मध्ये असावी . आणि पात्रता नंतर अनुभव पोस्टसाठी डोमेन किवा ग्रुप ब मध्ये ०९ वर्ष सेवा व ०२ वर्षाचा पोस्टसाठी डोमेन पात्रता नंतरचा अनुभव असावा .
  • असिस्टंट जनरल मॅनेजर : पूर्ण वेळची इलेक्ट्रीकल यांत्रिक /नागरी मध्ये बॅचलर पदवी मिळवली असावी . सरकारमान्य PCM किवा प्रतिष्ठीत विद्यापीठाकडून तसेच इलेक्ट्रोनिक्स /इलेक्ट्रोनिक व दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये मध्ये देखील बॅचलर पदवी मिळवली असावी .
  • अनुभव :- स्केल अधिकारी रु. च्या ग्रेड पे बरोबर ०७ वर्षाची सेवा . ०२ वर्षाचा पोस्टसाठी डोमेन पात्रता नंतरचा अनुभव असावा
  • असिस्टंट मॅनेजर : B.E./B. मॅकेनिकल /इलेक्ट्रीकल /इलेक्ट्रोनिक्स /आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियरींग मध्ये सरकारमान्य किवा मान्यताप्राप्त किवा नामंकित विद्यापीठाकडून B. Tech केले असावे .
  • अनुभव :- ०४ वर्षे वरिष्ठ पर्यवेक्षक रुपये . ग्रेड पे चा अनुभव .४०६००/- बरोबर पात्रता नंतर ०२ वर्षाचा अनुभव पोस्टसाठी इस्ट डोमेनमध्ये असावा . किवा जे अधिकारी सध्याच्या स्थितीत ज्युनियर स्केलमध्ये काम करत आहेत त्यांचे ग्रेड पे रु . ५४००/- (CDA
  • उप अभियंता ( सुरक्षा ) : सिव्हील मध्ये /इलेक्ट्रीकल /मॅकेनिकल मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून नामांकित असलेल्या विद्यापीठाकडून पूर्ण वेलची बॅचलर पदवी मिळवली असावी . २) तसेच सेन्ट्रल लेबर इन्स्टिट्यूट (सी एल आय ) किवा प्रादेशिक कामगार संस्था (आरएलआय) कडून ओउदोगिक सुरक्षितता मध्ये पदविका पदवी मिळवली हवी .
  • अनुभव :- सिनियर पर्यवेक्षक ०४ वर्षे रु . च्या ग्रेड पे चा अनुभव ४,६००/- असावा . आणि इस्ट मध्ये ०२ वर्षाचा पात्रता नंतरचा अनुभव असावा पोस्ट करिता डोमेन
  • कनिष्ठ अभियंता – II (RS) : : मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठ/महाविद्यालयातून पूर्णवेळ पदवी/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा.देखील बॅचलर पदवी मिळवली असावी .
  • अनुभव :- सरकारी कर्मचारी याच्यासाठी कमीत कमी वर्षे किमान पात्रता अनुभव असावा . IDA पे स्केल मध्ये रु . ३४०२० -६४,३१० /- ग्रेड किवा त्याच्या समतुल्य

: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ( Mumbai Metro Rail Corporation Limited ) मध्ये भरतीमध्ये उमेद्वारंची निवड प्रक्रिया हि मुलाखतीद्वारे केली जाईल यात उमेदवाराची वयक्तिक मुलाखत घेतली जाईल . उमेदवाराची पात्रता ,कामाचा अनुभव तसेच शैक्षणिक पात्रता या मध्ये पात्र ठरणारे उमेदवार यांची वरील भरतीकरिता निवड करण्यात येईल तसेच या भरतीमध्ये कागदपत्रांची छाननी देखील केली जाईल त्यासाठी उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे . या भरतीचे निवड करण्याचे सर्व अधिकार हे एमएमआरसीएलकडे देण्यात आले आहेत .

: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ( Mumbai Metro Rail Corporation Limited ) २०२४ च्या भरतीकरिता उमेदवाराना अर्ज करताना लागणारी वयोमर्यादा किती हवी ते खाली पहा .

पदांची नावे वयोमर्यादा
डेप्युटी जनरल मॅनेजर जास्तीत जास्त वयाची अट ४० वर्षे
असिस्टंट जनरल मॅनेजर जास्तीत जास्त वयाची अट ४० वर्षे
असिस्टंट मॅनेजर जास्तीत जास्त वयाची अट ३५ वर्षे
उप अभियंता ( सुरक्षा ):जास्तीत जास्त वयाची अट ३५ वर्षे
कनिष्ठ अभियंता – II (RS) जास्तीत जास्त वयाची अट ३५ वर्षे

तसेच वरील भरतीकरिता अर्ज करताना काही श्रेणीतील उमेदवारांना वयामध्ये सूट देण्यात आली आहे . ते खालीलप्रमाणे पाहू .

या भरतीमध्ये अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती /ओबी सी (नॉन -क्रिमी लेयर ) या वर्गातील उमेदवारांना वयामध्ये सूट / सवलती दिल्या आहेत . तसेच सरकारने जरी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार अपंग व्यक्ती (PWD) तसेच माजी सैनिक यांना हि वयामध्ये काही प्रमाणत सूट दिली आहे . तसेच आर्थिक दृस्थ्या कुमकुवत असलेले विभाग यांचा देखील यामध्ये समावेश होतो .

श्रेणी वयात सवलत
अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) ५ वर्ष
इतर मागास वर्गीय (OBC) नॉन क्रिमी लेयर ३ वर्ष
अपंग व्यक्ती (PWD) १० वर्ष
अपंग व्यक्ती (PWD) (ST) ०८ वर्ष
अपंग व्यक्ती (PWD) (OBC) अनारक्षित ०५ वर्ष
१९८४ च्या दंगलीमध्ये मरण पावलेले यांचे कुटुंब /मुले /सदस्य ०५ वर्ष
माजी सैनिक ०५ वर्ष

MMRCL 2024 च्या भरती अंतर्गत अर्ज करताना आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या तारखा पहा .

  • : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड 2024 ची अर्ज सुरु होण्याची तारीख १४ सप्टेंबर २०२४ आहे
  • मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड 2024 ची अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२४ हि आहे .

MMRCL २०२४ च्या भरतीसाठी उमेदवारांनी कसा अर्ज करावा त्याची सविस्तर माहिती खाली पहा .

  • वर देण्यात आलेल्या भरतीसाठी उमेदवारांना ऑन लाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत .
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचवी .
  • अर्जामध्ये उमेदवारांनी सर्व माहिती निट भरावी आणि शेवटच्या तारखेच्या आत अर्ज पाठून द्यावा . कारण उशिरा आलेले अर्ज नाकारले जाऊ शकतात .
  • अर्ज
  • आणि अर्ज हा दिलेले संबधित वेबसाईट वरूनच करावा www. mmrcl.com ह्या वेबसाईट वरून
  • तसेच उमेदवाराकडे सध्या चालू असलेला मोबाईल नंबर आणि ई – मेल आयडी असणे आवश्यक आहे .आणि तो चालू असावे कारण भरती बद्दलची काही सूचना किवा मुलाखतीच्या सूचना देणे mmrcl ला सोपे जाईल .
  • ऑनलाईन अर्ज हे १४ सप्टेंबर २०२४ ला सकाळी १० :०० वाजल्यापासून सुरु होईल आणि १२ ऑक्टोबर २०२४ रोजी २३:५९ वाजता बंद होईल .
  • अर्ज हे व्यवस्थित आणि काळजीपूर्वक भरावे आणि अर्ज पाठविण्याच्या आधी अर्जामध्ये काही बदल करायचा असल्यास करून घ्यावा नंतर परवानगी दिली जाणार नाही .
  • ह्या भरतीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी PDF जाहिरात खाली दिली आहे ती वाचा .
---Advertisement---

Related Post