About Us

सर्वात आधी सर्व मित्र आणि मैत्रीणीना माझा नमस्कार माझे नाव धनश्री बगाड मी पुणे येथील राहणारी आहे . मी एक हाउस वाईफ आहे . माझे राहणीमान साधे आहे . माझे शिक्षण B.A पर्यंत झाले आहे . मी ब्लॉगिंग च्या दुनियेत आक्टोंबर २०२३ मध्ये आले .२०२३ वर्षापासून मी ब्लॉगिंग क्षेत्रात काम करत आहे . ब्लॉगिंग करून आपल्याकडचे ज्ञान लोकांपर्यंत पोहचवून लोकांच्या समस्या सोडवाव्यात लोकांना हवी असणारी योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोचवावी म्हणून मी माझी एक जॉबची साईट तयार करून नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी नोकरीच्या पोस्ट लिहण्यास सुरवात केली .

साईट बद्दल माहिती

माझ्या साईटचे नाव Ishasdailyjob.com असे आहे .यावर मी रोजचे नवनवीन नोकरीच्या अपडेट्स देण्याचे काम करते . कारण आजकाल च्या जगात नोकरी मिळवणे खूप अवघड झाले आहे .असे अनेक मुले आणि मुली नोकरीच्या शोधात आहेत .कुणी सरकारी नोकरी ,कुणी प्रायवेट नोकरी पण नोकरी मिळवणे हल्लीच्या युगात खूप गरजेचे झाले आहे आणि खूप अवघड देखील झाले आहे . म्हणून अश्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना नोकरी मिळवणे सोपे जावे आणि त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी शोधता यावी हाच एक उद्देश आहे . आपल्या ह्या Ishasdailyjob.com वर सर्व प्रकारचे सरकारी आणि .खाजगी ,नोकरीच्या अपडेट्स पोस्ट केले जातात . पोलीस भरती .बँक भरती , आर्मी भरती ,रेल्वे भरती , यासारख्या सर्व भरतीच्या ताज्या अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील .

भाषा

आपल्या Ishasdailyjob.com वर फक्त मराठी भाषेमध्ये नोकरीच्या सर्व अपडेट्स पोस्ट केले जातात . कारण माझी भाषा मराठी आहे . त्यामुळे तुम्हाला येथे मराठी नोकरीच्या अपडेट्स मिळतील .

आमच्याशी संपर्क साधा

तुम्हाला जर आमच्या Ishasdailyjob.com वरच्या नोकरीच्या सर्व पोस्ट आवडत असतील आणि आमच्या Ishasdailyjob.com बद्दल काही समस्या असतील तर खाली दिलेल्या लिंकद्वारे तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता .

https://www.facebook.com/people/dhanashri-bagad/100090651073323